Saturday, June 4, 2011

स्पंदने ..

स्पंदने ..

माझ्या अंगणात
तुझ्या पावलांचे ठसे
पाहताना उर
कसा कासाविसे

तु जाताना दिलेले
एक मोगरीचे फुल
अजुनही घाली बघ
माझ्या मना भूल

किती वाटले सांगू
तुला जाऊ देवू नये..
माझ्याच कुंपणानी
मला अड़विले..

पुन्हा वळुन तु पाहता
भय मनाचे दाटले
अड़वीन मी तुला रे
पुन्हा माझ्याचसाठी रे

मी आहेच इथे
तु परतशील जेंव्हा
तुझी माझी स्पंदने
एका लयीत असतील तेंव्हा ....
पृथा..

धावा

घुमला पावा, मनीच्या गावा
सावळ्या हरीचा करिता धावा

दैवी रव, घेई हृदयाचा ठाव
मज पामराची ऐलतिरी नाव
सांग कैसे येऊ, अजुनी शैशव

मधुगंधी.. तरल तुझा सहवास
समर्पिण्या.. अपुरा माझा श्वास
मोक्षासाठी भक्तीची धरितो कास

पृथा..

शामसंध्या..



शामसंध्या..

शामसंध्या उधळीत रंग
आली नाचत गात
कातर वेळही मध्येच केव्हा
काळीज छेडून जात

आठवणीत होउन दंग
झेले चाँद बरसात
गुज मनीचे सांगताना
डोळे चिंब भिजतात

रिमझिमते ओले अंग
परततिचे थवे पाहत
विश्वास मनाला देऊन जाते
हळ्वी कोमल चाँद रात

बहरुन येई अंतरंग
विचारांचे काजवे मनात
पाहते उद्याचा सूर्योदय
त्याच्या इवल्याशा किरणात

पृथा..