न जाणे कित्येक वर्षे ..... मी असा आतमध्ये हे विश्व घेउन जगतोय माझ्याही नकळत पुटावर पुट चढ़ताहेत आवरणाची प्रावरणाची हव्या असणा-या अन नसणा-याही विचारांची .... मी मात्र मग्न , हरवलेला... भौतिकतेतच..
पण जेंव्हा आता अचानक दिसतेय प्रतिमा त्या शुन्यतेची तसा उलगडत चाललोय मी मला स्वतःला.. रेशमाच्या अलगद लडीसारखा आता जाणवताहेत त्या वळकटया सा-या विश्वाच्या .. त्या शुन्य जगाच्या माझ्याच विचारांच्या.. आता जाणवताहेत...