Saturday, June 4, 2011


चल ना ........
चल ना.. त्या क्षितिजाच्या पार जाऊ
चंद्र चांदण्यासवे इंद्रधनू आणू

पावसाच्या सरींना धरून भराभर वरती जाउ
सूर्याच्या किरणांना घेऊन हलकेच खाली येऊ

कापुस पिंजल्या ढगांना आणखी पिंजून टाकु
इंद्रधनूच्या रंगांना दाही दिशांना फेकु

मोठ्या काळ्या ढगाला हळूच टाचणी टोचु
त्यांनी आपल्याला गाठायच्या आत परत इथे पोचू

चल ना ........
पृथा..

No comments: