Sunday, May 18, 2008

न बरसता घन गेले परतुन

न बरसता घन गेले परतुन
कळ आली खोल उगा अंतरातुन


दडल्या होत्या आशा पोटी
बांधल्या पदराच्या गाठी
उदास गीत उमटले ओठातुन
न बरसता घन गेले परतुन


समजावु किती कशी मनाला
गोड अशी ओढ़ हृदयाला
निसटाले जणू काही काळजातुन
न बरसता घन गेले परतुन


प्रीतीच्या झुल्यावर झुलले गं
प्रेमाला त्याच्या भुलले गं
आता काटे बसले ईथेच रुतुन
न बरसता घन गेले परतुन
पृथा॥
ते..
ते
'त्यां'च्या गावाला
खरंच जायचय एकदा
तिथे ते घोळक्याने
सारे उभे असतात
शांत , एकटक बघत
त्यांचे डोळे कधीच दिसत नाहीत
त्यांचा आवाजही कधीच ऐकू येत नाही
तरीही ते बोलतात ,कुजबुजतात
दुरुनच ते न्याहाळत असतात
आपल्याला ..
आणि आपल्यातल्याच कोणालातरी
कदाचित त्यांनाही यायचं असेल
आपल्या गावाला..
कदाचित..
पृथा..