न बरसता घन गेले परतुन
न बरसता घन गेले परतुन
कळ आली खोल उगा अंतरातुन
दडल्या होत्या आशा पोटी
बांधल्या पदराच्या गाठी
उदास गीत उमटले ओठातुन
न बरसता घन गेले परतुन
समजावु किती कशी मनाला
गोड अशी ओढ़ हृदयाला
निसटाले जणू काही काळजातुन
न बरसता घन गेले परतुन
प्रीतीच्या झुल्यावर झुलले गं
प्रेमाला त्याच्या भुलले गं
आता काटे बसले ईथेच रुतुन
न बरसता घन गेले परतुन
पृथा॥
Sunday, May 18, 2008
Wednesday, February 13, 2008
अम्रुतवेल ..
नाही यौवनाची प्रेरणा
सार्या संसाराचा आधार
खोल भावनेची जोड़
अशी ही अम्रुतवेल
या वेलिवर झूले
मैत्री आणि करुणा
आत्मप्रेमाचे कवच फोडून
होते विश्वाशी एकरूप
अशी ही
पण जेव्हा तिला सुचेना
आत्मपुजेशिवाय काही
तो इतरांचा शत्रु स्वतःचाही वैरी
मग बनते ती विषवेल
अशी ही अम्रुतवेल
पृथा..
सार्या संसाराचा आधार
खोल भावनेची जोड़
अशी ही अम्रुतवेल
या वेलिवर झूले
मैत्री आणि करुणा
आत्मप्रेमाचे कवच फोडून
होते विश्वाशी एकरूप
अशी ही
पण जेव्हा तिला सुचेना
आत्मपुजेशिवाय काही
तो इतरांचा शत्रु स्वतःचाही वैरी
मग बनते ती विषवेल
अशी ही अम्रुतवेल
पृथा..
Subscribe to:
Posts (Atom)