Tuesday, February 5, 2008

मागणे..

ना दाद मागते
ना प्रतिसाद मागते
ना न्यायासाठी कुठल्या
मी वाद मागते

ना शब्द मागते
ना अब्द मागते
ना कवितेवरती माझ्या
मी लुब्ध मागते

ना रंग मागते
ना संग मागते
ना आत्म्यासही माझ्या
मी अंग मागते

ना सुर मागते
ना नूर मागते
ना काळजासाठी या
मी हुरहुर मागते

ना गीत मागते
ना हित मागते
ना जगण्यासाठी साधी
मी रित मागते

ना राग मागते
ना लोभ मागते
ना उरातल्या आगीचा
मी प्रक्षोभ मागते

ना जन्म मागते
ना मृत्यु मागते
या कालचक्राच्या पाशातुन
मी मोक्ष मागते

पृथा..

No comments: