एक मखमली नक्षी ..
एक सुरकुतीदार मखमली चेह~याची नक्षी
त्यांचा चेहरा म्हणजे एक तलम वस्त्र असतं
अनुभवाच्या सुतानी विनलेलं
प्रत्येक सुरकुती म्हणजे एक धागा
एक कष्टाचा, एक मधल्या आरामाचा
एक आनंदाच्या फुलांचा ,एक दु:खाच्या काटयाचा
एकात थोडी संतापाची पहाट असते
तर एकीत मिश्कीलिची लाट असते
एकीत कुठे अभिमानाची बाब असते
तर एकीत शरमेचिही राख असते
एकीत अनुभवलेल्या सुखाची याद असते
एकीत न अनुभवलेल्याची दाद असते
एक खुप काही असल्याची सुरकुती
तर एक काहीही नसल्याची सुरकुती
एक स्मितेची लकेरही सरकत जाते
कारणाशिवाय सुरकुती बनुन
या सुरकुत्यामधून डोकवणारे
नाक, कान, डोळे, ओठ
सारे मिळुन बनलेली असते
एक सुरकुतीदार मखमली चेह~याची नक्षी
एक मखमली नक्षी
..पृथा..
Tuesday, February 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment