पुन्हा तेच ते झुरणे ,पुन्हा एकटेच उरणे
वाहून सर्वस्व आपुले ,होउन कफल्लक फिरणे
पुन्हा अंधार दाट्तो, चन्द्र चांदण्या वाटतो
झगडून शुक्रासाठी मी, पुन्हा रिकामाच उरतो
पुन्हा मेघ दाटतात, घन ओथंबुन वाह्तात
झेलुनी पाउस सारा ,मी कोरडाच राहतो
पुन्हा सागर भरतो , नभ प्रतिमा दावतो
वेचुनी शिंपले सारे, मोती मला न गवसतो
लडून साऱ्या जगाशी , बदनामी मीच झेलतो
जिंकुनी अवघे विश्व, मी एकटाच उरतो
पुन्हा पहाट होते, पुन्हा सूर्य उगवतो
नव्या उमेदिने जगण्यासाथी, मी पुन्हा जन्म घेतो
मी पुन्हा जन्म घेतो
पृथा ..
Tuesday, February 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment